साखरवाडी गणेश पवार
वाठार निंबाळकर तालुका फलटण येथून मुकेश दत्तात्रय नलवडे (वय 41) हे दिनांक 24 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालायला जातो असे सांगून घरातून निघून गेले असून ते परत न आल्याने त्यांची पत्नी माधुरी मुकेश नलवडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत करीत आहेत