साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहरातील खुनाच्या गुन्ह्यात मागील तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपी विष्णु अशोक भोसले रा.महादेव नगर फलटण हा माकडमाळ फलटण येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर दिनांक दि ११ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपीस पकडले व त्यास पुढील कारवाई करीता फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. सदर कारवाई मध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक,बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर , सहायक पोलीस निरीक्षक पवार ,भारे , पोलीस उप निरीक्षक , शिंगाडे , सहायक फौजदार तानाजी माने , सुधिर बनकर , पोलीस हवालदार साबीर मुल्ला , मंगेश महाडीक , अमोल माने , पोलीस नाईक अमीत सपकाळ अर्जुन शिरतोडे , अजित कर्णे , शिवाजी भिसे , म.पो.ना. मोनाली निकम पो.कॉ. स्वप्नील दॉन्ड , स्वप्नील माने , वैभव सावंत , मोहसिन मोमीन यांनी सहभाग घेतला.