साखरवाडी(गणेश पवार) निरगुडी ता फलटण येथे ग्रामपंचायत निरगुडी यांच्या वतीने पंधराव्या वित्त आयोग व ग्रामनिधी मधून पंधरा लाख निधी मंजूर करून त्यामधून उद्घाटन व भूमिपूजन सोहळा पार पाडला. या मध्ये प्रामुख्याने फलटण तालुक्यातील पहिली वाहिली इलेक्ट्रिकल घंटागाडीचे उद्घाटन निरगुडीतील दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते पार पाडले, गावातील नागरिकांसाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरो प्लांट भूमिपूजन, अंगणवाडी समोरील पेव्हर ब्लॉक भूमिपूजन,मांडव-खडक येथील भुयारी गटर, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, फॉगिंग मशीन, ग्रास कटर मशीन ,जिल्हा परिषद शाळेसाठी स्मार्ट टीव्ही व कम्प्युटर आणि पंधरा टक्के ग्रामनिधीतून साऊंड सिस्टिम,फर्निचर,भांडी देण्यात आली अशा विविध वस्तूंचे व प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले .
विविध प्रकल्पांचे भूमिपूजन वेळी निरगुडी मधील ज्येष्ठ नागरिक,महिला व निरगुडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कोमल सस्ते,उपसरपंच सारिका बनसोडे सदस्य.शाहूराज सस्ते सिकंदर जाधव .रमेश निकाळजे मंगल जाधव दिपाली मदने युवा नेते सचिन सस्ते व निरगुडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते