साखरवाडी(गणेश पवार)
माढा लोकसभा मतदार संघाचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय जल समिती अध्यक्ष कुशवेंद्र ओहरा यांची भेट घेतली व निरा देवधर धरणाच्या निधीबाबत चर्चा केली. लवकरच निरा देवघरसाठी केंद्र शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती कुशवेंद्र ओहरा यांनी दिली यावेळी दोघांच्या मध्ये महाराष्ट्रातल्या 55 दुष्काळी तालुक्याच्या नदी जोड प्रकल्पबाबत तसेच कायमस्वरूपी दुष्काळ संपवण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना यावेळी खासदार निंबाळकर यांनी दिल्या याबाबत जलसंपदा सदस्यांची बैठक ज्या राज्यामध्ये चांगलं काम सुरू आहे अशा राज्यामध्ये अभ्यास दौरा करून जलसंपदा सदस्य व संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून या प्रश्नावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल व पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीमधुन वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी याचा वापर दुष्काळी भागाला कसा करता येईल ही माहिती खासदारांनी दिल्यानंतर कोल्हापूर ,सांगली, सातारा, सोलापूर ,तसेच मराठवाड्यातील काही दुष्काळी तालुके या भागामध्ये पाणी कशा पद्धतीने नेता येईल यावर केंद्रशासनाने लवकरच समिती घटीत करावी अशाही सुचना यावेळी खासदार निंबाळकर यांनी केल्या व निरा देवघर धरणाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भुमिके बाबत कुशवेंद्र ओहरा यांचे खासदार निंबाळकर यांनी यावेळी आभार मानले.