साखरवाडी(गणेश पवार)
कोपर्डे ता खंडाळा येथें लांडग्यांनी बकऱ्यांवर हल्ला केला यामध्ये १२ बकरी ठार झाली तर २ बकरी जखमी झाले आहे . यामध्ये उमेश बोडरे , रमेश बोडरे , ज्ञानेश्वर बोडरे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे . वाघरीमध्ये बकरी बसवली असताना लांडग्याने हा हल्ला केला वनपरिक्षेत्र अधिकारी पी.सी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश शिंदे , वसंत गवारी , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . जमदाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला