Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणी विकास सोसायटीची आज निवडणूक व निकाल -निकालाकडे तालुक्याचे लक्ष vidani

 



 विडणी -(योगेश निकाळजे) -विडणी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आज रविवारी होत असून आजच या सोसायटीवर राष्ट्रवादीची की भाजपची सत्ता राहणार याकडे विडणीकरांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

      फलटण तालुक्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणारी विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन 2023ची पंचवार्षिक निवडणूक लागली असून आज रविवार दिनांक 19 रोजी प्राथमिक शाळा विडणी येथे सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे या निवडणूकीचा निकाल आजच लागणार असून13 जागांसाठी ही लढत होणार आहे यासाठी सोसायटीचे एकूण2589 सदस्य असून या निवडणूकीत आज 1853 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत,

      या सोसायटीवर आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या राजेगटाचीच सत्ता राहिली असून गेल्या पंचवार्षिक निवडणूकीतही श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेश्वर पॅनेलच्या 13 जागाही निवडून आणल्या होत्या,मात्र या निवडणूकीत भाजपप्रणीत विडणी विकास आघाडी ही सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत होत असल्याने ही निवडणूक राष्ट्रवादी व भाजप पक्षांच्या प्रतिष्ठेची बनली असल्याने या निवडणूकीच्या प्रचारात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर,सरपंच सागर अभंग यांच्या तोफा कडाडल्या होत्या.

       या निवडणूकीत मतदारराजा  कोणाच्या बाजूने कौल देणार हे आज संध्याकाळपर्यत समजणार असल्याने या निकालाची उत्सुकता विडणीकरांसह संपूर्ण फलटण तालुक्याला लागली आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.