साखरवाडी(गणेश पवार)
निंभोरे तालुका फलटण गावातील राजवल्ली पीर साहेब यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाले असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी जाधव यांच्या फिर्यादीनुसार संशयित कल्पेश पांडुरंग कांबळे, ऋषिकेश भाऊसो कांबळे, विशाल बापू घाडगे, योगेश बाळासो कांबळे, अमित सतीश कांबळे, सर्व राहणार निंभोरे यांनी दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास गावातील राजवल्ली पीर साहेब यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यावर येऊन गोंधळ घालीत किशोर मोरे यांच्याकडील कुस्त्यांचे इनाम देण्यात असलेली 70 हजार रुपये रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेऊन आम्हास दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे तर दुसऱ्या तक्रारीत फिर्यादीने संशयित विजय शिवाजी जाधव, निलेश मदने, नितीन मदने ,प्रदीप जाधव, शिवाजी जाधव, बापू वाघमोडे सुरेश पिसाळ, अजय भंडलकर, किरण (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा निंभोरे यांनी मी गावातील यात्रेनिमित्त कुस्त्या पाहण्यासाठी गेलो असता तुमचे कुस्त्या खेळण्याचे काम नाही म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून लोखंडी गज, सुरा, काठीने मारहाण करून माझ्या मोटरसायकलचे नुकसान केले असल्याचे म्हटले आहे त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे करीत आहेत