विडणी(योगेश निकाळजे)
दि 19 मार्च रोजी झालेल्या विडणी विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उत्तरेश्वर पॅनेलने सर्व जागांवर बहुमताने विजय मिळवून सोसायटीवरील आपली सत्ता कायम ठेवली असून या निवडणूकीत विजय झालेल्या सर्व विजयी उमेदवारांचे तसेच विडणीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला
यावेळी विजयी उमेदवार अशोक अभंग, विलास अभंग, सोनबा आदलिंगे, साहेबराव ननावरे,रामदास नाळे,किसन शेंडे, सौ. जयश्री टिळेकर, सौ.विजया पवार, मुरलीधर जगताप, लक्ष्मण कोकरे, मारुती नाळे, मारूती पवार,बाळू पवार या सर्वांचे सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक - निंबाळकर यांनी केले.
यावेळी विडणी विकास सोसायटी विजयाचे शिल्पकार श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, सर्जेराव नाळे,डॉ रवि शेंडे,तुकाराम अब्दागिरे ,कैलास जगताप ,राजीव पवार, सुरेश शेंडे ,डॉ.किरण शेंडे, हणमंत टेंबरे, दशरथ मदने,सागर जगताप यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. .