साखरवाडी(गणेश पवार)
राष्ट्रहित फाउंडेशन आणि ह्युम्युनिटी वेल्फेअर सोसायटी च्या सहकार्याने 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय संवाद परिषदेचे बिकानेर राजस्थान आयोजन करण्यात आले होते यामध्ये आप्पासाहेब घोरपडे हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांना कारगिल योद्धा नायक दीपचंद, तसेच कर्नल हेलसिंग शेखावत यांच्या हस्ते ग्लोबल ह्युमिनिटी चेंज मेकर अवॉर्ड सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला बिकानेर चे आयुक्त माननीय पवन कुमार, कारगिल युद्ध नायक दीपचंद, कर्नल हेलसिंग शेखावत ,आदरणीय मेवासिंग उपस्थितीत होते. या ट्रेनिंग मध्ये नेत्रदान ,अंगदान ,रक्तदान तसेच हुमन मिल्क बँक याविषयी सर्व ट्रेनिंग देण्यात आले या ट्रेनिंग साठी देश विदेशातील समन्वयक उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना माननीय आप्पासाहेब घोरपडे बोलले की हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून हर्ष फाउंडेशन मधील सर्व पदाधिकारी, रक्तदाते ,आयोजक तसेच वेळोवेळी मदत करणाऱ्या बँक यांचा आहे .