विडणी (योगेश निकाळजे) -विडणी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनेलच्या प्राचारार्थ आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणारी व नावलौकिक असणारी विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनेलच्या प्रचारार्थ आज शुकवार दि.१७ रोजी सायंकाळी ७ वाजता २५ फाटा (नाळेवस्ती) येथे माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली आहे,या सभेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर ,श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे,डॉ. उत्तमराव शेंडे, जगन्नाथ नाळे, सर्जेराव नाळे,डॉ. रवि शेंडे,राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोसायटीचे सभासद मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
विडणी सोसायटीवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचीच एकहाती सत्ता राहिली असून ही सत्ता अशीच अबाधित ठेवण्यासाठी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ही पंचवार्षिक निवडणूक जिंकणारच या जोशात प्रचाराची धुरा संभाळत आहेत. दरम्यान आज सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेस सर्वानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तरेश्वर पॅनेलच्यावतीने करण्यात आले आहे.
.jpeg)