विडणी -(योगेश निकाळजे) -विडणी गावात विरोधक राष्ट्रवादीने मंजूर केलेल्या विकासकामांचे नारळ फोडून श्रेय घेत असून त्यांनी स्वतः मंजूर करून आणलेल्याच विकास कामांचे श्रेय घ्यावे असे स्पष्ट मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विडणी ता.फलटण येथे राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने विविध फंडातून मंजूर करण्यात आलेल्या 24 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा आदलिंगेवस्ती व 25 फाटा (नाळे वस्ती) येथे भूमीपूजन शुभारंभ आयोजीत करण्यात आला यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते,यावेळी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, उत्तमराव आदलिंगे, अंकूश आदलिंगे, मारुती नाळे,संजय अभंग,राजीव पवार,कैलास जगताप,तुकाराम अब्दागिरे, दत्ता अब्दागिरे, मुरलीधर जगताप तसेच ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे म्हणाले की गेल्या 25 वर्षापासून श्रींमत रामराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक कोटींची विकासकामे विडणीत झाली आहेत व यापुढेही होणार आहेत मात्र विरोधक आम्ही मंजूर करुन आणलेल्या कामांचे स्वतः श्रेय घेत आहेत मात्र जनता आमच्याच पाठीशी असून यापुढेही राजे गटाच्या माध्यमातूनच विडणीचा विकास साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळीआदलिंगेवस्ती येथे नागरी सुविधा योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचा रस्ता तसेच आमदार फंडातून4लाख रुपयांचे हनुमान मंदिर समोर ब्लॉक टाकण्यात येणार आहेत तर 25फाटा (नाळेवस्ती) येथे 8 लाख रुपयांचे डांबरीकरण तर 7 लाख रुपयांचे खडीकरण असे एकूण24 लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून या सर्व कामांचे मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे.