साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथील फुलेनगर येथे राहणारी विवाहित महिला दिनांक 7 फेब्रुवारी पासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पूनम अनिल यमकर ही विवाहित महिला दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली असल्याची फिर्याद विवाहितेचे पती अनिल भीमा यमकर (वय 34) यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मोहन हंगे करीत आहेत