साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभागामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चौथी कक्षेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध वैज्ञानिक उपकरणांची प्रात्यक्षिके प्रदर्शनासाठी मांडली होती. यावेळी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्राथमिक विभागाचे मुख्यध्यापक संदीप चांगण व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक तुळशीदास बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
28 फेब्रुवारी 1928 या दिवशी डॉ. सी.व्ही.रामन. यांनी आपला शोध निबंध 'रामन परिणाम' जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाकडे छापण्यासाठी पाठवला होता.या घटनेच्या स्मरणार्थ भारत देशामध्ये 1987 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो .याचे औचित्य साधून प्रशालेत आज विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनात प्रशालेतील इयत्ता-४थी.च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे,वैज्ञानिक मूल्य रुजवणे हा हेतू साध्य करण्यासाठी या उपक्रमाचे प्रथमच प्रशालेत आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शन भरविण्यासाठी इयत्ता-४थीच्या वर्गशिक्षका रेश्मा कर्वे व कु भाग्यश्री खरात यांचे विशेष सहकार्य लाभले.संस्थेच्या सचिव उर्मिला जगदाळे यांची कार्यक्रमासाठी विशेष प्रेरणा मिळाल्याचे यावेळी मुख्याध्यापक यांनी सांगितले .प्रदर्शन पाहण्यासाठी बहुसंख्य पालकांनी गर्दी केली होती. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, संचालक राजेंद्र शेवाळे, राजेंद्र भोसले यांनी कौतुक केले यावेळी प्रशालेच्या शिक्षिका वनिता भागीत, पूनम बोंद्रे, शुभांगी भोईटे, स्नेहल पवार, कर्मचारी वृंद व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.