साखरवाडी गणेश पवार
निंभोरे तालुका फलटण येथून अज्ञाताने अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीस पळवून नेण्याचे फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात मुलीच्या नातलगांनी दिली असून त्यानुसार दिनांक 27 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी बाथरूम वरून येथे असे सांगून गेली असल्याने व ती माघारी न आल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत