साखरवाडी(गणेश पवार) रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती ता.फलटण येथील दहावीच्या 1993/94 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा लोणावळा येथे नुकताच आनंदात पार पडला यावेळी सर्व मित्रांना तब्बल 29 वर्षांनी पाहून एकमेकांची आस्थेने चौकशी करीत ही दोस्ती तुटायची नाय असा संदेश देत एकमेकांबरोबर गप्पा मारल्या.
मैत्री जीवनातील अनेक प्रसंगी होते,पण गरिबी डोक्यावर असताना जी शाळेत मैत्री झालेली असते ती कधीच त्या आठवणीतून/मानातून/हृदयातून जात नाही,श्री जितोबा विद्यालय जिंती येथील 1993/94 चे विद्यार्थी तब्बल 29 वर्षानी भेटले आणि आपल्या जुन्या नव्या आठवणीने त्यांना पुन्हा आपण लहानच असल्याचे आठविले व त्याच आठवणीत एकमेकांना भेटले व सर्वांची मनापासून आठवणी काढून अक्षरशः डोळे भरून आले, व आता ही दोस्ती तुटणार नाही असे एकमेकांना भावनिक वचन दिले.
दरम्यान रयत शिक्षण संस्था ही स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले असून त्या मध्ये त्या काळचे मुख्याध्यापक बी.के.चव्हाण व त्यांच्या बरोबर असलेले सर्वच शिक्षक यांनी केलेले मार्गदर्शन व संस्कार अजूनही टिकून असल्याचे या सर्वात जाणवले त्या मुळे भेटायला आल्यानंतर सर्वांनी मिळून आपल्या जीवनातील चढ उतार व इंटरेस्टिंग स्टोरी सांगितल्या या ऐकून अनेकांनी आपली ओळख सांगितली,तसेच आपन एक जबाबदार नागरिक आहोत,व आपल्यावर ग्राम दैवत श्री जितोबा देवाचे आशीर्वाद असल्याने या पुढे सर्वांनी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊ असे अभिवचन दिले.
दरम्यान हा स्नेह मेळावा लोणावळा/खंडाळा या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या दि ड्युकस रीट्रीट या आलिशान हॉटेलमध्ये पार पडला यावेळी ॲड.अनिल भोईटे,ॲड.सारिका खलाटे,ॲड.विजय भोसले,उद्योजक रवींद्र गिरी,अनिता रणवरे,मनीषा रणवरे,सुनीता शिंदे,रुपाली रणवरे,राणी रणवरे,सचिन बर्गे,नंदकुमार भोसले,विजय मोरे,दीपक कुदळे,व पत्रकार यशवंत खलाटे पाटील उपस्थित होते.