विडणी(योगेश निकाळजे)
विडणी ता फलटण येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत व डिजेच्या दणदणाटासह शाही मिरवणूक काढून शिवप्रेमींच्या मोठ्या अपूर्व उत्साहात विडणी येथे शिवजयंतीउत्सव साजरा करण्यात आला.
संभाजी ब्रिगेड विडणी व माझेरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीउत्सव मोठया दणक्यात साजरा करण्यात आला, सकाळी सरपंच सागर अभंग यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब साळूंखे,राहूल शिर्के,सुबोध शिर्के,पंकज शिर्के,सचिन अभंग, सौरभ जगताप तसेच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सायंकाळी 7 वाजता शिव व्याख्याते रवीकुमार ठावरे यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले,तत्पूर्वी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे,श्रीनिवास पवार,अॅड. अविनाश अभंग,तुकाराम अब्दागिरे यांच्याहस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी विजय अभंग, राजवर्धन कारंडे,कु.राधिका रायते यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर शौर्या पवार या बालिकेने शिवगर्जना केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले तर आभार बाळासाहेब लाड यांनी मानले.
कार्यक्रमानंतर शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयांची शाही मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये पालखी व घोड्यांचाही समावेश होता, जय भवानी,जय शिवाजी या जयघोषाने तसेच डीजेच्या दणदणाटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता,या मिरवणूकीत गावातील महिला व युवावर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.