साखरवाडी (गणेश पवार)
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुभत्या जर्सी गाईच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यानुसार गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन विशेष पथक तयार करण्यात आले होते हे विशेष पथकाने वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने गोपनीय तसेच तांत्रिक विश्लेषण करुन संशयित विनोद निवृत्ती खरात रा . भांडवली ता.माण , संतोष शामराव सोनटक्के , रा . भांडवली ता . माण जि . सातारा , सतिश रमेश माने रा . तोंडले ता . माण यांना शिताफीने पकडून त्यांच्याकडून 33 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तिथून मिळालेल्या अधिक माहीती नुसार जर्सी गाई चोरी गुन्ह्यांची संशयतांकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली . परंतु त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला केल्यावर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशसन हद्दीत 3 ठिकाणी , औंध पोलीस स्टेशन , मेढा पोलीस स्टेशन , लोणंद पोलीस स्टेशन याठिकाणी असे 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे . त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे 33 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या त्यामध्ये 9 जर्सी गाई व वाहने जप्त करण्यात आली आहे.गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींचेकडून 3 फरारी आरोपींच्या कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख,पोलीस बापू बांगरअपर पोलीस अधीक्षक ,तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे , प्रमोद दिक्षीत , पोलीस उपनिरीक्षक , सहा . पोलीस फौजदार राऊत , पोलीस नाईक अभिजीत काशिद , पोलीस नाईक अमोल जगदाळे , पोलीस कॉस्टेबल महेश जगदाळे , पोलीस कॉस्टेबल विक्रम कुंभार यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता .