साखरवाडी गणेश पवार
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यासह देश भरात उत्साहात साजरी होत असते यामध्ये महिलाही मागे नसून फलटण तालुक्यातील सुरवडी(घारगे मळा) याठिकाणी महिलांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली विशेष म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या दादासाहेब पीर मंदिरात ही शिवजयंती साजरी केली.
सुरवातीला शिवज्योत प्रज्वलित करून महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले नंतर सर्व महिलांनी महाराजांचा जन्म उत्सव पाळणा गायला.यावेळी बालचमुंसाठी भाषण स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, महाराजांच्या पोवाडा गायन स्पर्धा शिवतेज गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी विजेत्या मुला, मुलींना व महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले छपती शिवाजी महाराज्यांच्या महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला महिलांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या शिवजयंतीचे सुरवडीसह सर्वत्र कौतुक होत आहे.