साखरवाडी(गणेश पवार)
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दि.२२रोजीच्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाच्या अनुषंगाने सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या वतीने फलटण सातारा रोडवर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वाठार निंबाळकर चिंचपाटी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे या निवेदनामध्ये म्हटले आहे की,
कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवावी,उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, सदोष कृषी पंपाची वीज बील दुरूस्त करून मिळावे,वीज दर नियामक आयोगात सुचवलेली ३७ टक्के दरवाढ रद्द करावी,शेतीचा दिवसा १२ तास लाईट मिळावी,ऊस तोडणी साठी ५ ते १० हजार मागणी करणाऱ्या मुकादमावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत ,नियमीत कर्ज फेड करणारया शेतकरयांना ५० हजार प्रोत्साहन पर अनुदान त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे
या निवेदनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर,जिल्हा सरचिटणीस डाॅ रविंद्र घाडगे,तालुका अध्यक्ष नितीन यादव,युवा आघाडी राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे,पक्ष तालुका अध्यक्ष दादा जाधव,फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर,पक्ष उपाध्यक्ष शकिल सिकंदर मणेर,बाळासाहेब शिपकुले,प्रल्हाद अहिवळे,शिवाजी सोडमिसे,निखिल नाळे,शशिकांत नाळे,नारायण अभंग,किसन शिंदे,पिंटू भापकर,राहुल कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.