साखरवाडी(गणेश पवार)
अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग फलटणमध्ये उत्साहात साजरी झाली. महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात करून त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास संस्कृतीचा होणारा र्हास टाळता येईल असे प्रतीपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. नार्वे यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या उपस्थितीत प्रतीमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, सर्व नियामक मंडळ सदस्य, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.