साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने मार्डी येथे झालेल्या निमंत्रित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला.
साखरवाडी संघाचा पहिला सामना खंडाळा ब यांच्यात झाला या सामन्यात साखरवाडी संघाने एक डाव १५ गुणांनी विजय मिळवला तर उपांत्यपूर्व फेरीचा सामना साखरवाडी विरुद्ध अपशिंगे यांच्यात झाला या सामन्यात साखरवाडी संघाने एक डाव ३ गुणांनी विजय मिळवला उपांत्य फेरीचा सामना साखरवाडी विरुद्ध चौधरवाडी यांच्यात झाला या सामन्यात साखरवाडी संघाने एक डाव ५ गुणांनी विजय झाला तर अंतिम सामना साखरवाडी विरुद्ध खंडाळा अ यांच्यात झाला या सामन्यात साखरवाडी संघाने एक डाव ५ गुणांनी विजयी झाला साखरवाडी संघाने विजय मिळवला विजयी संघाला रोख रक्कम ७ हजार ७७७ रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले या विजया बद्दल त्यांचे दादाजी कोंडदेव पुरस्कार विजेते प्रशिक्षक संजय बोडरे, साखरवाडी क्रीडा मंडळचे खेळाडू ,तुषार भोसले,विक्रम जगताप,विवेक भोसले,निलेश शिंदे, निलेश भोसले,हेमंत जाडकर या सर्वांनी अभिनंदन केले त्याचबरोबर साखरवाडी विद्यालय संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, संचालक राजेंद्र शेवाळे,राजेंद्र भोसले व साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापक उर्मिला जगदाळे,प्रवेशक हरिदास बागडे, सर्व पालक वर्ग या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.