विडणी(योगेश निकाळजे)
विडणी येथील उत्तरेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीनिमित्ताने उत्तरेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये शुक्रवार दि.17 रोजी सकाळी7.30 वाजता शिवलीला पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला,रात्री9 वाजता ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला,शनिवार दि.18 रोजी सकाळी 7 वाजता श्रींची आरती व सकाळी11ते4 वाजता गावातील भजनी मंडळांचा हरिनाम जागा होऊन यामध्ये उत्तरेश्वर भजनी मंडळ,महादेव भजनी मंडळ, इंगळे कदम भजनी मंडळ,हनुमान भजनी मंडळ,सोनवडी भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ,बागेचामळा आदी भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता, सायंकाळी7 वाजता श्रींची आरती व रात्री10 ते12.30 वाजेपर्यंत ह.भ.प.हनुमंत महाराज मारकड(करमाळा) यांचे किर्तन झाला, रात्री11 वाजता लघुरुद्र अभिषेक व ठिक12.35 वा. बेल व पुष्पवृष्टी करण्यात आली तर रात्री1 ते 2.30 वा. होमहवन विधी संपन्न झाला.
रविवार दि.19 रोजी सकाळी8.30 वाजता शिवलीला पारायणाची समाप्ती होऊन त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, महाशिवरात्रीनिमित्ताने विडणी, पिंप्रद,सोनवडी,वडले या गावांसह पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी उत्तरेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.