साखरवाडी(गणेश पवार)
सुरवडी ता. फलटण येथील खवळे वस्ती येथे गेल्या ३५ वर्षापासून दरवर्षी कै.दादा पांडुरंग खवळे यांच्या कृपाशीर्वादाने महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवात अध्यात्मिक भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरवडी गावचे उपसरपंच विजय खवळे व कुटुंबियाकडून यांनी केले आहे.
या कार्यक्रमानिमित्त शनिवारी १८ रोजी प्रकाशनाथजी आई पंथ यांच्या उपस्थितीत शिवलीलामृत वाचन,पूजा शिव पूजा,शंख पूजा होणार आहे. याचे वाचन बाळासाहेब (बालकनाथ)घाडगे महाराज यांच्या उपस्थितीत होणार असून महाराष्ट्राच्या विविध भागातून एकतारी भजनी मंडळ भाग घेणार आहेत.
या कार्यक्रमास फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील उपस्थित राहणार आहेत.तरी परिसरातील सुरवडी साखरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ९ सर्कल,१६फाटा खवळे वस्ती येथे कार्यक्रमास उपस्थित राहावे. तसेच महाप्रसादाचे नियोजन रविवारी १९ रोजी सकाळी ७ ते २ या वेळेत होईल असे, आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.