'
साखरवाडी गणेश पवार
रॉकबॉल हा खेळाचा नवीन प्रकार प्रथमच पाहून मी अचंबित झालो या खेळाला इतर खेळाच्या तुलनेत जास्त मोठे मैदान व सहभागी खेळाडूंना खेळासाठी जास्तीचा खर्च येत नसल्याने या खेळाचा प्रसार सर्व दूर पोहचून भविष्यात हा खेळ ऑलिंपिक मध्ये खेळला जावा यासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाडेगाव येथे महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा रॉकबॉल अमॅच्युअर असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय पुरुष/ महिला मिश्र व सहाव्या ज्युनिअर मुले/ मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा रॉकबॉल अमॅच्युअर असोसिएशन आयोजित पाडेगाव (ता फलटण) येथील समता आश्रम शाळेच्या प्रांगणात दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन फलटण कोरेगाव चे आमदार दीपक चव्हाण व पंचायत समिती फलटणचे माजी सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला होता. यामध्ये देशभरातील एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये अंतिम फेरीत पुरुष व महिला मिश्रमध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र संघाने, द्वितीय पुरस्कार तेलंगणा तर तृतीय क्रमांक छत्तीसगड संघांनी पटकावला 19 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक पंजाब, द्वितीय क्रमांक हरियाणा तर तृतीय क्रमांक राजस्थान संघाने पटकावला मुलींमध्ये प्रथम क्रमांक हरियाणा,द्वितीय हिमाचल प्रदेश,तृतीय क्रमांक तेलंगणा संघाने पटकावला या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील पाच खेळाडू चमकले त्यामध्ये प्रणय पवार(सुरवडी),ओम जाधव(पाडेगाव),जयेश भोसले(माण),समृद्धी गायकवाड(तरडगाव),मयुरी सूर्यवंशी(पाडेगाव) यांचा समावेश आहे.
पाडेगाव येथील कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी महाराष्ट्र रॉकबॉल अमॅच्युअर असोसिएशनचे अध्यक्ष विनोदराव शेडगे,सचिव मारुती हजारे,, खजिनदार राजेंद्र डोंगरे , महाराष्ट्र तांत्रिक कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग भगत तडवी,कोतकर(अहमदनगर),सोनाली मॅडम(पुणे),उदय गायकवाड(सांगली) यांनी परिश्रम घेतले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खेसे यांनी केले तर आभार पांडुरंग भगत यांनी मानले.