साखरवाडी(गणेश पवार)
सातारा जिल्हा परिषद आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेत दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये फलटण पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील संघाने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक कराड तर तृतीय क्रमांक सातारा संघाला मिळाला.
फलटण तालुक्यातील बीबी गावचे आरोग्य सहाय्यक विक्रम खानविलकर व तरडगाव चे आरोग्य सहाय्यक सुनील भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला एकूण बारा संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये पंचायत समिती फलटणच्या आरोग्य सहायकांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व फलटण तालुका गटविकास अधिकारी अमिता गाडवे यांनी दोघांचे अभिनंदन केले.