विडणी(योगेश निकाळजे)
विडणी ता फलटण येथे आज(सोमवार) रोजी विविध विकास फंडातून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 34 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन नूतन सरपंच सागर अभंग व ग्रामस्थांच्याहस्ते करण्यात आले, या विकास कामांमध्ये संत रोहिदास नगर येथे सुमारे 14 लाख रुपयांचे गावातील विद्यार्थासाठी अभ्यासिका केंद्राचे भूमीपूजन करण्यात आले, आदलिंगेवस्ती येथे 5 लाख रुपयांचे अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करण्यात येणार आहे तसेच 25 फाटा ते नरुटेवस्ती येथे 8 लाख रुपयांचे डांबरीकरण मंजूर करण्यात आले तर बापू नाळे वस्ती येथे 7 लाख रुपयांचे खडीकरण करण्यात येणार असून या सर्व मंजूर झालेल्या कामांचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास माजी सरपंच चंद्रकांत नाळे,ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब साळूंखे, विठ्ठल नाळे, सोपानराव ननावरे, नारायण अभंग,सचिन अभंग विशाल शिंदे, सहदेव बागडे, मारुती नाळे,बापूराव नाळे, विठ्ठल कोकरे,हणमंत नरुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.