विडणी -(योगेश निकाळजे)
विडणी येथील आरंभ प्री स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
विडणी ( लिंबटेक) मांगोबा माळ येथील आरंभ प्री.स्कूलचा तिसरा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा नुकताच आयोजीत करण्यात आला होता, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, ओमकारा ड्रायव्हींग स्कूलचे संस्थापक हणमंत टेंबरे,प्रकाश टिळेकर, हणमंत अभंग, हणमंत जाधव, रघुनाथ ननावरे इत्यादीं मान्यवर उपस्थित होते,सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले
.
या स्नेहसंमेलनात स्कूलच्या बालचमूने विविध गाण्यांवर आकर्षक वेषभूषा करत चांगलाच ठेका धरुन उपस्थितांची मने जिंकली, स्कूलमध्ये वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण आयोजीत करण्यात आले होते.सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे, हणमंत टेंबरे, हणमंत अभंग तसेच काही पालकांनी आरंभ प्री स्कूलच्या आजपर्यंतच्या कार्याबदल समाधान व्यक्त करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,मान्यवरांचे स्वागत स्कूलच्या संस्थापक प्रा.कावेरी शेंडे यांनी केले , सूत्रसंचालन शिक्षिका सौ. क्रितिका कांबळे यांनी केले तर आभार शिक्षिका सौ.भारती टिळेकर यांनी मानले.