साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथील फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंकित येणाऱ्या साखरवाडी पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नितीन शिंदे यांची नियुक्ती झाली असून 2013 साली पोलीस सेवेत भरती झालेले नितीन शिंदे या आधी फलटण शहर पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते. साखरवाडीत त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल साखरवाडी चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, उपसरपंच अक्षय रुपनवर, डॉक्टर आनंदा जाधव ग्रामपंचायतचे माजी सदस्य दत्तात्रय बोडरे व ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
साखरवाडी सारख्या महत्त्वाच्या व मोठ्या बाजारपेठेच्या गावांमध्ये याआधी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यानंतर साखरवाडी पोलीस चौकीला नितीन शिंदे यांच्या रूपाने खमका अधिकारी भेटला असून यामुळे साखरवाडीतील वाढत्या चोऱ्या, अवैध दारू विक्री,जुगार,गांजा विक्री, परिसरातील प्रचंड वाढलेल्या चोऱ्या या गोष्टींना चाप बसावा अशी मागणी साखरवाडी व साखरवाडी पोलीस चौकीच्या अंतर्गत येणाऱ्या 15 गावातील नागरिकांमधून होत आहे.