फलटण ग्रामीण पोलीसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई.
साखरवाडीची वार्ताJune 07, 2022
0
.
साखरवाडी गणेश पवार
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीवर कारवाई केली असून एकुण १,३३,४७१ रूपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात मिळालेल्या अधिक माहितीनुसार,मौजे वाजेगाव ता . फलटण गावचे हद्दीत केशव विठोबा गायकवाड रा . वाजेगाव ता . फलटण हा त्याच्या सुरज किराणाजनरल स्टोअर्स दुकानामध्ये गुटख्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता सूरज किराणा जनरल स्टोअर्स या दुकानाचे बाहेर असलेले जिन्याखाली एकूण २१७ ९ ८ / - रुपये किंमतीचा गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने साठा केलेला मिळून आलेने पोलीसांनी लागलीच पंचाचे समक्ष जप्ती पंचनामा करून मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेथुन आरोपी केशव विठोबा गायकवाड वय ६० वर्षे रा . वाजेगाव पोस्ट . निंबळक ता.फलटण , जि . सातारा याचे विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ३ ९ ६ / २०२२ भा.द.वि.स.कलम ३२८ , १८८,२७२,२७३ , अन्न सुरक्षा आणि मानके अधि . २००६ २६ ( २ ) ( i ) ( iv ) , २७ ( ३ ) ( e ) , ३० ( २ ) ( ३ ) , ५ ९ अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली २०११ चे कलम ३,१,७,२,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपीची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो . फलटण यांचे कोर्टातुन पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेवून सदर आरोपी यास विश्वासात घेवून आरोपीस सदरचा माल कोणाकडुन खरेदी केला याबाबत विचारपुस केली असता अटक आरोपी यांने सदरचा गुटखा हा फलटण येथील संतोष दोशी यांचे दुकानतुन घेवून आलेचे सांगितलेने आम्ही पोलीस व पंच असे संतोष रतनलाल दोशी यांचे दुकानात गेलो असता दुकानाचे शेजारी असले गोडाऊन मध्ये तसेच आरोपी क्र .२ यांचे राहते घराचे खाली असले किराणामालाचे गोडाऊन मध्ये एकुण १,११,६७३ / - रूपये किमतीचा गुटखा मिळुन आलेने सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली आहे . सदर आरोपी यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करणेत आलेली आहे . सदरची कारवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे , पोलीस उपनिरीक्षक, सागर अरगडे , उर्मिला पेंदाम , दादासो यादव , अभिजीत काशिद , राजेंद्र गायकवाड , अमोल जगदाळे व गणेश अवघडे यांनी केली.