Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषी कन्यांनी सांगवी येथे दिले बोर्डो मिश्रण निर्मितीचे प्रात्यक्षिक



फलटण चौफेर दि ११ डिसेंबर २०२५

फलटण तालुक्यातील सांगवी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषी कन्यांनी  ग्रामीण जागृतता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक सलंग्नता उपक्रम २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत दिले बोर्डो मिश्रण निर्मितीचे प्रात्यक्षिक.

बोड्रो मिश्रण म्हणजे काय ? मोरचुद (कॉपर सल्फेट), चुना (Lime) आणि पाणी यांच्या प्रमाणशीर मिश्रणास बोर्डो मिश्रण असे म्हणतात. प्रा. पी. ए. मिलार्डेट यांनी १९८२ मध्ये मोरचूद आणि चूना यांच्या  मिश्रणाचा शोध लावला. याचा वापर प्रथम फ्रान्समधील बोडरे शहरातील द्राक्षांवरील केवडा रोगाच्या नियंत्रणा साठी केला गेला. तेव्हापासून सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळ‌बागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रणासाठी वापर केला जात आहे. भारतात फळपिकांपासुन मिळणाऱ्या उत्पादनात लिंबुवर्गिय फळपिकांचा फार मोठा वाटा आहे. त्यात प्रामुख्याने लिंबुवर्गिय फळपिकांवर येणारे विविध रोग जसे खैऱ्या, विषाणुजन्य मंदह्रास, जलदह्रास बुरशीजन्य पायकूज, मुळकुज, शेंडेमर आणि डिंक्या होय. ह्या बुरशीजन्य रोगांपासून बचावात्मक उपाय म्हणजेच बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रण यांचा उपयोग करणे होय. पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांणसुन त्यांचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रण व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे.या उपक्रमात शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन उत्तम प्रतिसाद दिला.

 कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित,  कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, AIA प्रमुख प्रा. जी. बी. अडसुळ, प्रा. एस. एम. साळुंखे, विषय विशेषज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या सना शेख, भाग्यश्री जाधव, श्रद्धा राऊत, पूजा सरक, प्राजक्ता सस्ते व सानिका गोफणे यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.