फलटण चौफेर दि १६ डिसेंबर २०२५ - ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५ - २६ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील सोनवडी खुर्द येथे शेतकऱ्याच्या शेतात जाऊन मातीचे नमुने शास्त्रीय पद्धतीने कसे गोळा करावेत याचे प्रात्यक्षिक आयोजित केले.
या उपक्रमादरम्यान, कृषीदूतांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याची वैज्ञानिक पद्धत समजावून सांगितली. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या नमुन्यांमुळे अहवाल दिशाभूल करणारे ठरू शकतात, त्यामुळे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे होते.
प्रात्यक्षिकादरम्यान करून दाखविलेले महत्त्वाचे टप्पे:
१) 'V' आकाराचा खड्डा : शेतातील वेगवेगळ्या ६ ठिकाणांहून इंग्रजी 'व्ही' (V) आकाराचे खड्डे घेऊन, त्यातील २ इंच जाडीचा मातीचा थर कापून नमुने कसे गोळा करावेत, हे दाखवण्यात आले.२) नमुना मिसळणे: गोळा केलेले नमुने एका स्वच्छ पोत्यावर एकत्र करून, हाताने चांगले मिसळून त्याचे चार भाग करणे आणि त्यातील समोरासमोरील दोन भाग बाजूला काढण्याची प्रक्रिया स्पष्ट केली गेली.3) वर्ज्य जागा: खते साठवण्याची जागा, झाडांखालील जागा किंवा पाण्याचे पाट यांजवळून नमुने घेणे कसे टाळावे, याबद्दल मार्गदर्शन केले. मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन करण्यात आले.या वेळी सोनवडी खुर्द गावचे सरपंच श्रीमती. शालन सोनवलकर, उपसरपंच माननीय श्री. दत्तात्रय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री. अक्षय सोनवलकर व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हा उपक्रम ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, तसेच प्रा. जी .बी.अडसूळ, प्रा. जी. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे यांनी कार्यक्रम आयोजित केला.
