फलटण चौफेरदि.१० डिसेंबर २०२५
दुधापासून बनविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पदार्थांपैकी एक पदार्थ पेढा आणि त्यापासून बनणारे विविध पदार्थ व ते जास्त काळ टिकवून कसे राहतील याची संपूर्ण प्रक्रिया कृषीकन्यांनी प्रात्यक्षिकांसह लाटे येथील महिलांना समजावून दिली. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या महिलांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील ७ व्या सत्रातील कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत पेढा बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून गावातील स्त्रियांना प्रशिक्षित केले आहे. कृषीकन्या ऐश्वर्या गायकवाड, शिवानी चाबुकस्वार, वैष्णवी पारसे, कोमल महाले, सानिका जाधव, अक्षदा निगडे, यांनी हा कार्यक्रम राबवला. कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, प्रा. एस. एम. साळुंखे,AIA प्रमुख प्रा. डॉ.जी.बी. अडसूळ,विषय विशेषज्ञ प्रा. आर.डी. नाईकवडी,यांचे मार्गदर्शन लाभले.
