फलटण चौफेर दि. १५ सप्टेंबर २०२५
वीर धरणातून निरा नदीत पुन्हा एकदा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी वाजता नदीपात्रातील विसर्गात वाढ करून १७ हजार १११ क्यूसेक्स इतका सोडण्यात आले आहे.
धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे व वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, शेतीतील जनावरे व साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.