फलटण चौफेर दि ५ सप्टेंबर २०२५
ऊसतज्ज्ञ व कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली "ऊस पिक परिसंवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार (दि. ५ सप्टेंबर २०२५) रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.हा परिसंवाद शिव हनुमान गणेशोत्सव तरुण मंडळ तडवळे ता. फलटण, यांच्यावतीने आयोजित करण्यात आला असून ऊस उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, कीड नियंत्रणाचे उपाय, तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना या विषयांवर डॉ. चोरमुले मार्गदर्शन करणार आहेत.या "परिसंवादाला" परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.संपर्कासाठी : श्री. अमोल खराडे – ९६३७८००३५२.