Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण मध्ये ओबीसींचा एल्गार : सोमवारी रस्ता रोको आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करू : ओबीसी संघर्ष समिती



फलटण चौफेर दि ३० ऑगस्ट २०२५

            ओबीसी मधून मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणी साठी मराठा क्रांती मोर्च्या चे शेकडो तरुण मुंबईत दाखल झाले असतानाच संघर्ष भूमी फलटण येथून फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने या मागणी विरुद्ध एल्गार पुकारला असून ओबीसींच्या हक्काचे असणारे आरक्षण अबाधित रहावे व आगामी काळात ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ नये या मागणी साठी फलटण तालुक्यातील ओबीसी बांधव यांनी येत्या सोमवारी रस्ता रोको चा इशारा दिला आहे फलटण येथील संत सावतामाळी मंदिर येथे आयोजित संघर्ष बैठकीत शेकडो तरुण व जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते  या बैठकीत मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणी विरोधात कोणताही ओबीसी समाज नसून त्यांना त्यांच्या संख्ये नुसार वेगळे आरक्षण देण्यात यावे यासाठी जातनिहाय जनगणना त्वरित करावी अशीही मागणी ओबीसी संघर्ष समितीने यावेळी एकमुखाने केली असून येत्या सोमवारी फलटण येथील नाना पाटील चौक येथे सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन होणार असून ओबीसी यावेळी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत 

                ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असताना ओबीसी शांत बसणार नाहीत कोणाच्याही आवास्तव मागणी साठी शासनाने ओबीसींचा बळी देऊ नये असाही सूर यावेळी उपस्थितांच्यातून उमटला आहे  यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे बापूराव शिंदे , भीमदेव बुरुंगले , डॉ बाळासाहेब शेंडे , गोविंद भुजबळ ,अमिरभाई शेख , फलटण तालुका शिवसेना प्रमुख पिंटू इवरे , संदीप नेवसे , मिलिंद नेवसे दादासाहेब चोरमलेअजय माळवे  अरविंद राऊत ,  विकास नाळे , दीपक शिंदे , गिरीश बनकर , दत्ता नाळे , प्रा बाळासाहेब घनवट , बाळासाहेब अडसूळ , रणजित भुजबळ , विजय शिंदे , बापूराव बनकर बंडू शिंदे शनेश शिंदे विवेक शिंदे इत्यादीसह शेकडो तरुण उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.