फलटण चौफेर दि ९ जुलै २०२५
सुरवडी गावाचे सुपुत्र व राष्ट्रीय समाज पक्षाचे कट्टर समर्थक विशाल बापू माडकर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री, महादेव जानकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील सामाजिक, राजकीय व युवकांच्या प्रश्नांवर आपुलकीने संवाद साधला.
या भेटीदरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाली. यामध्ये माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते (नाना), सुरवडी गावचे युवा उद्योजक ज्ञानदेव साळवे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तुषार जगताप, युवा नेते निलेश लांडगे, फलटण-कोरेगाव विधानसभा प्रमुख रमेश चव्हाण, सोशल मिडिया प्रमुख विक्रम माने, कुमार ऋषिकेश बिचुकले, साखरवाडी गावचे सुपुत्र मयूर धोत्रे आणि कु. निखिल कुचेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.
ही भेट केवळ स्नेहपूर्वक नव्हे तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारी ठरली. सामान्य कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणारे, मातीशी नाळ जपणारे आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळखले जाणारे जानकर साहेब यांनी आपल्या या भेटीतून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असल्याचे विशाल माडकर यांनी सांगितले.