फलटण चौफेर दि ५ जुलै २०२५
लोणंद ता. खंडाळा येथील एका फरशीच्या दुकानातून दि २ रोजी फिर्यादी कपील धन्यकुमार जाधव यांच्या दुकानातील ड्राव्हरमधुन कोणीतरी अज्ञाताने रोख रक्कम १ लाख ४७ हजाराची चोरी केल्याची घटना घडली होती याबाबत लोणंद पोलीस स्थानकात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला होता याबाबत लोणंद पोलिसांनी तपास करून संशयित हसीना दस्तगिर सय्यद वय ३२ वर्षे व दस्तगिर मुबारक सय्यद वय ४१ वर्षे दोन्ही रा. बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे, देऊर ता.कोरेगाव जि. सातारा यांना अटक केली आहे
याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात आतून मिळालेली अधिक माहितीनुसार रोकड चोरीची घटना घडल्यानंतर लोणंद पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली असता पोलीसांनी गोपनीय माहीती काढून सदर गुन्हा हा देऊर ता. कोरेगाव येथील रहीवाशी पती पत्नी यांनी केला असलेची खात्री केली व तात्काळ पोलीस पथकाने यातील दोघांना ताब्यात घेवुन अटक केली.
सदर दोन्ही आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी सो, खंडाळा यांचे समक्ष हजर करुन त्यांची दोन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीत असताना सदर दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन आरोपींकडुन गुन्हयातः चोरी केलेला संपुर्ण मुददेमाल रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत,सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो सातारा तुषार दोशी सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल घस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोहवा संतोष नाळे, पो.ना बापुराव मदने, पो. कॉ. अंकुश कोळेकर, अमोल जाधव, विठठल काळे, अमीर जाधव महीला पो.कॉ. अश्विनी माने यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन पोलीस हवालदार संतोष नाळे हे पुढील तपास करीत आहेत. मा.पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले