फलटण चौफेर दि १० जुलै २०२५ चौधरवाडी गावात कृषी कन्यांनी चौरस प्रणाली पद्धतीने पेरू या रोपाची लागवड केली.चौकोनी लागवड, किंवा चौरस पद्धतीने लागवड, म्हणजे झाडे किंवा रोपे एका चौरसाच्या आकाराप्रमाणे लावली जातात. यात, दोन ओळींमधील आणि दोन रोपांमधील अंतर समान ठेवले जाते, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते.
चौकोनी लागवडीचे फायदे:
१.सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर:
झाडे एकमेकांना जास्त झाकणार नाहीत, अशाप्रकारे लागवड केल्यामुळे सूर्यप्रकाश सर्व झाडांना पुरेसा मिळतो, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगली होते.
२.हवेचा खेळता वापर:
दोन रोपांमधील मोकळ्या जागेमुळे हवा खेळती राहते, ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
३.उत्पादन वाढ:
पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळाल्याने, पिकांची वाढ चांगली होते आणि चांगले उत्पादन मिळते.
४.सोपे आंतर मशागत:
चौकोनी लागवडीमुळे, दोन रोपांमधील अंतर समान असल्याने, आंतर मशागत करणे सोपे जाते.
५.यांत्रिक पद्धतीने लागवड आणि काढणी:
या पद्धतीने लागवड केल्यास, ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांचा वापर करणे सोपे होते, ज्यामुळे वेळेची आणि मजुरांची बचत होते.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषीकन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत,काटकर स्नेहा संजयकुमार,कांबळे सानिका अमोल, कदम रोहिणी लक्ष्मण, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कांबळे प्रणोती सुनील, लडकत श्रेया संजय या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.