फलटण चौफेर दि १७ जुलै २०२५
फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील धबधब्याजवळ पर्यटक महिलांवर दरोडा टाकून लूट करणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी आठ तासांत छडा लावला. या घटनेनंतर पोलिसांनी जीव धोक्यात घालून वारुगडच्या डोंगरकपारीत १० किमी चित्तथरारक ट्रेकींग करत तीन सराईत गुन्हेगारांना अंधारात पाठलाग करून अटक केली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,दि. ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास धुमाळवाडीच्या धबधब्यावरून परतणाऱ्या पर्यटक महिलांवर वारुगड टेकडीवरील टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी सुरा दाखवून सोन्याचे दागिने, घड्याळ व रोख रक्कम असा एकूण ५४,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटला. महिलांच्या आर्जवाला प्रतिसाद देत पोलीस पाटील पल्लवी पवार यांनी प्रसंगावधान राखत घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून, केवळ संशयितांचे तुटपुंजे वर्णन घेऊन ६ तासाच्या शोधमोहीमेनंतर खालील तीन संशयित गुन्हेगारांना अटक केली:दिपक नामदेव मसुगडे, (वय 30), रा. नवलेवाडी, ता. माण,विलास उर्फ बाबू दत्तात्रय गुजले, (वय 21), रा. खांडज, ता. बारामती,चेतन शंकर लांडगे, (वय 25), रा. सोनगाव बंगला, ता. फलटण अशी नावे आहेतगुन्ह्यावेळी वापरलेला चाकू व बजाज पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
या गुन्ह्यात आणखी सात संशयित रणजित कैलास भंडलकर,तानाजी नाथाबा लोखंडे दोघे रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा,अक्षय महादेव चव्हाण, रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे, वैभव सतिश जाधव,रामा शंकर जाधव, सुरज कैलास जाधव, रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झाला आहे. सदरचे संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारमारी व विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत दहिवडी, फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार, तसेच धुमाळवाडीचे शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर गुन्ह्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 510/2025, भादंवि कलम 310(2) अन्वये करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करत आहेत.