तरडगाव(नवनाथ गोवेकर)
सौ वेणूताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज तरडगाव येथे आज सोमवार दि१६ रोजी नवीन प्रवेशित विद्यार्थी यांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात व आनंदी वातावरणामध्ये जंगी स्वागत करण्यात आले या प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्वप्रथम परिपाठ घेण्यात आला यामध्ये राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रार्थना संविधान व राज्य गीत व संस्थेची प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर सर्व महिला शिक्षिकांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण केले व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते हरिपाठ पुस्तक पेन व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभिजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या काकडे एस. जी. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. क्रीडाशिक्षक पवार यांनी परिपाठ घेतला व सूत्रसंचालन तांबे यांनी केले तसेच ग्रंथपाल खलाटे सर यांनी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. तसेच तरडगाव, कुसुर, शिंदेमाळ व ठोंबरे वस्ती एस .टी. बस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक डांगे एस जी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले.