फलटण चौफेर दि १९ जून
साखरवाडी (ता. फलटण) येथील रोहित कुंडलिक भोसले पत्नी मीनल भोसले यांनी आपल्या कन्या मीराचा पहिला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. सामाजिक जाणीव जपत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा, साखरवाडी येथे विद्यार्थ्यांसोबत हा आनंदाचा क्षण साजरा केला.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत मीराचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुलांना स्वादिष्ट केक, फराळ व मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. भोसले कुटुंबियांनी हा क्षण विद्यार्थ्यांसोबत शेअर करून एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
"मुलांचा खरा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आहे. आपण आपला आनंद समाजातील इतरांसोबत साजरा केल्यास त्याची खरी खूण पटते," असे रोहित भोसले यांनी यावेळी सांगितले.यावेळी शाळेचे मुख्यध्यापक निवास पवार,हिम्मत शिंदे,संदीप पंडीत, संस्थेचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य हरीश गायकवाड,नितीन भोसले,अनिल भोसले व कुटुंबीय उपस्थित होते उपस्थित पालकांनी भोसले दांपत्याच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.