Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुधेबावीतील राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 



फलटण चौफेर दि १६ जून २०२५

 दुधेबावी ता फलटण येथील राजे गटाचे  ग्रामपंचायतचे मा सरपंच भाऊसाहेब मोरे व त्यांचे सहकारी पत्रकार सचिन मोरे  तानाजी मोरे, संतोष मोरे,मनोज मोरे सर,सनी मोरे, समीर मोरे,लक्ष्मण मोरे, योगेश मोरे,तसे सर्व कार्यकर्त्यांनी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली  भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.



यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कोळकी मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, युवा नेते नानासाहेब आडके, मा. सरपंच त्रिंबक सोनवलकर , उत्तमराव सोनवलकर , संतोष सोनवलकर भाऊसाहेब सोनवलकर व गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले की दुधेबावी ग्रामस्थांना संपूर्ण विकास कामासाठी सहकार्य केले जाईल तसेच या भागातील कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवणार नसल्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले की फलटण तालुक्याचा  सर्वांगीण विकास करायचा असेल तर मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सर्व गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे व गावांमधील जे काही उर्वरित प्रमुख कार्यकर्ते लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.