फलटण चौफेर दि २८ जून २०२५
तरडगाव (ता. फलटण) येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी भेट देऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी मंत्री गोरे व आमदार पाटील यांनी पालखीच्या सुव्यवस्थेसाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. तरडगाव व सुरवडी येथे उभारण्यात आलेल्या जर्मन टेंटसह, वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, विशेषतः मोफत मसाज केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांची विचारपूस करत त्यांच्या समस्या व गरजांची माहिती मंत्री व आमदारांनी घेतली. शासनामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सर्व सेवा व्यवस्थितपणे पोहोचत असल्याची खातरजमा त्यांनी केली.
या दौऱ्यात मंत्री व आमदारांसोबत जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार उपस्थित होते.
यासोबतच स्थानिक पदाधिकारी बापूराव शिंदे, अमित रणवरे, अतुल गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रशांत गायकवाड, जालिंदर सस्ते, बंडू सस्ते, युवराज सस्ते आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पाहणी व नियोजनात सहभाग घेतला.