फलटण चौफेर दि १५ जून २०२५
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फलटण शहरात दिनांक २८ जून रोजी आगमन होणार आहे विमानतळावर दरवर्षी माऊलींच्या पालखीचे स्वागत व विसाव्याची भव्य व्यवस्था केली जाते. मात्र यंदा पालखीच्या विसाव्याच्या ठिकाणात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या ठिकाणाहून ५० फूट दक्षिणेकडे मुख्य तंबू हलवण्यात आला असून, या बदलामुळे पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना अधिक सुलभ दर्शनाची सुविधा मिळणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली
फळटण नगर परिषदेच्या वतीने यंदा नवीन तंबूच्या ठिकाणी अधिकृत फलक लावण्यात आला असून, यामुळे वारकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. हा निर्णय मुख्यतः पालखीच्या दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.
वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन व सुरळीत वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हे स्थान बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा माऊलींच्या पालखीच्या विसाव्याचा अनुभव अधिक सुव्यवस्थित होणार आहे.
फलटण नगर परिषद, पोलीस प्रशासन व पालखी समिती यांनी मिळून या नव्या जागेची व्यवस्था केली आहे. याबाबत वारकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.