Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पालखी सोहळ्यातील गैरसोयीची पुनरावृती नको - विश्वस्त योगी निरंजननाथ तरडगाव येथील गतवर्षीच्या समस्यांचा सोहळा प्रमुखांनी वाचला पाढा



तरडगाव (नवनाथ गोवेकर) 

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा मागील वर्षी तरडगाव मुक्कामी असताना मुसळधार पावसाने वारकऱ्यांची गैरसोय झाली होती, यावर्षी विशेष काळजी घेऊन गैरसोयची पुनर्वृती होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालखीतळ पाहणी दरम्यान श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी प्रशासनाला दिल्या.




श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक २७ जून रोजी तरडगाव मुक्कामी येत आहे. मागील वर्षी पालखी तरडगाव मुक्कामी असताना मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या राहुट्यामध्ये पाणी शिरल्याने गैरसोय झाली होती. सकाळी प्रस्थान वेळी देखील पालखी सोहळ्यातील वाहने चिखलात अडकून पडल्याने प्रस्थान कार्यक्रांत देखील अडथळा निर्माण झाल्याचे योगी निरंजननाथ यांनी बोलून दाखवले. पाण्याचा निचरा न झाल्याने सदर परिस्थिती निर्माण झाल्याने वारकऱ्यांसह पालखी सोहळा समिती यांच्यात नाराजीचा सूर होता.



यावर्षी पावसाच्या अनुषंगाने विशेष काळजी घ्यावी. दोन क्रेन व जेसीबी उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना देखील यावेळी सबंधित विभागाला करण्यात आल्या. पाण्याचा योग्य निचरा होईल अशी खबरदारी घेऊन पालखी तळाची तयारी करावी अशा सूचना पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी प्रशासनाला दिल्या. या पहाणी प्रसंगी विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, फलटण प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, पो.नि. सुशील भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.