फलटण चौफेर दि २४ जून २०२५
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्राथमिक कलानुसार निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात मोठी लढत पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे माळेगाव कारखान्यावर कोणाची सत्ता राहणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जोरदार प्रचार केला होता, तर चंद्रराव तावरे यांनी आपला मजबूत गट टिकवून ठेवला होता.
आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे. निळकंठेश्वर पॅनलने दोन जागांवर स्पष्ट आघाडी घेतल्याची माहिती आहे.
या निकालामुळे कारखान्याच्या आगामी कारभाराचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. अंतिम निकालाची प्रतीक्षा असून, कारखाना परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि वातावरण तापले आहे.