Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माळेगाव साखर कारखाना निवडणूक निकाल अजित पवार विजयी, निळकंठेश्वर पॅनलच्या २ जागा आघाडीवर

  


फलटण चौफेर दि २४ जून २०२५

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ब वर्ग मतमोजणीत अजित पवार यांना १०१ पैकी ९१ मते मिळाली असून, त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या भालचंद्र देवकाते यांना केवळ १० मते मिळाली आहेत.



अजित पवार यांच्या या विजयामुळे माळेगाव परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, ठिकठिकाणी गुलाल उधळत, फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात येत आहे.



दरम्यान, अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या इतर दोन जागांवर देखील आघाडीची स्थिती कायम आहे. सुरुवातीच्या फेरीत या दोन जागांवरही त्यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर असून, पॅनलचा मजबूत पकड कारखान्यावर राहण्याची शक्यता आहे.अधिकृत अंतिम निकाल काही वेळात जाहीर होणार आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.