फलटण चौफेर दि १६ जून २०२५: तालुक्यातील दालवडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी गावातील शेतकरी व दालवडी "महिला जनजागृती बचतगट"अतंर्गत कृषिदुत आदर्श पाटिल, ओंकार साळुंखे, सुशांत भोसले, विनायक कांबळे, अभिजीत यादव, आदित्य पवार, प्रतिक सुर्वे यांनी फळांचे जाम बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले.
त्याचबरोबर फळांची उपलब्धता, फळांची प्रकिया, चवीसाठी, काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी तसेच दीर्घ काळासाठी साठवणूक करण्यासाठी जाम बनविला जातो व त्यांचे दर वाढविण्याचे महत्व पटवून दिले.या कार्यक्रमासाठी उषा जाधव , सुप्रिया कोलवडकर,राणी कोलवडकर,रुपाली कोलवडकर, शालन कोलवडकर, अंजना ननावरे, मनिषा कोलवडकर , अंजना चव्हाण, तांबे,आदी महिलांची उपस्थिती होती.
कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे , प्रा.नीतिषा पंडित, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.