तरडगाव (नवनाथ गोवेकर)
फलटण तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तरडगाव ता. फलटण येथील शेतकरी नंदकुमार श्रीरंग भंडलकर यांच्या घराची एक भिंत कोसळली. या दुर्घटनेत एक शेळी मृत्युमुखी पडली. भिंत पडल्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे भंडलकर कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेटीदरम्यान प्रशासनाला केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील अनेक कच्ची घरे धोक्याच्या स्थितीत आली आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळेत खबरदारीची पावले उचलावी, असे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.