फलटण चौफेर दि २६ मे २०२५
बाणगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे सस्तेवाडी येथील माजी सरपंच सुनील वाबळे यांच्या घरास चारही बाजूंनी पुराचा वेढा बसला होता. रात्रीच्या वेळीच महायुतीकडून तातडीने मदत पोहोचवण्यात आली. यानंतर आज सकाळी एनडीआरएफची विशेष बचाव टीम आणि आमदार सचिन पाटील यांनी वाबळे वस्तीला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी मॅडम, नायब तहसीलदार अभिजित सोनावणे, महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. एनडीआरएफच्या जवानांनी परिसराची पाहणी करत संभाव्य धोके टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या.
महापुरामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेवर मदत मिळाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडून पुनर्वसन व तत्काळ मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.